Sunday 17 September 2017

दर रविवारी गावात साफ सफाई

दर रविवारी गावासाठी दोन तास ठरल्या प्रमाणे आज ही गावात साफ सफाई करण्यात आली.


Tuesday 15 August 2017

शिरूड येथे विविध कार्यक्रम...

आज जि प शिरुड शाळेचे माजी विद्यार्थी व शिरुड विकास मंचचे कार्यकारी सदस्य इंजिनिअर श्री जितेंद्र जिजाबराव पाटील साहेब यांनी शाळेला भेट दिली कामाचे कौतुक केले व 5000 रुपयांची देणगी दिली साहेब आपले शाळेतर्फे व SVM तर्फे खूप खूप आभार.                        

आज दि 15 ऑगस्ट 2017 ,71 वा स्वातंत्र्यदिन शिरुडला मोठया उत्साहात साजरा केला गेला याप्रसंगी जि प प्रा शाळा शिरुड येथे शाळा व्यवस्थापन समितीचे सक्रिय सदस्य श्री सुकलाल बारकू पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

व्ही झेड पाटील हायस्कूल येथे आज 71 व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वज वंदन भाउसो श्री भालेरावजी उत्तमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

 शिरूड हायस्कूल डिजीटल वर्गाचे उद्घाटन करतांना हायस्कूल  शालेय समीतीचे अध्यक्ष श्री जयवंत नाना , BMC चे इंजिनियर श्री जे. जे पाटील साहेब, गावातील जेष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते.व्ही. झेड. पाटील हायस्कूल डिजीटल होण्यासाठी चिकाटीने काम करणारे मुख्याध्यापक श्री जे एम बापु यांचा सत्कार शिरुड गावातरफे व दत्त सार्वजनिक वाचनालया कडुन शाल श्रीफळ देऊन श्री डी. ए. धनगर सर यांच्या हस्ते करण्यात आला

 शिरूड प्राथमिक केंद्राच्या आरोग्य सेविका यांचा सेवानिवृत्ती निमित्त श्री दत्त सार्वजनिक वाचनालया कडुन 15 आॅगष्ट चे औचित्य साधून श्रीमती सविता अहिरे यांच्या हस्ते साडी, चोळी, श्रीफळ पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला

आज दि. 15 आॅगष्ट रोजी आपल्या गावाचे रहिवासी तथा      BMC चे इंजिनियर श्री जे. जे. पाटील साहेब यांनी हायस्कूल येथे डीजीटल वर्गाला भेट दिली व डीजीटल वर्गाला  रोख 5000 हजार रूपयांची देणगी म. मुख्याध्यापक श्री जे  एम बापु यांच्या कडे दिली. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री जे  जे  पाटील साहेबांचे आभारी आहोततिज्ञा सर्वांनी घेतली.

Sunday 13 August 2017

स्वच्छता कार्यक्रम क्षणचित्रे



सुंदर शिरूड,स्वच्छ शिरूड

शिरूड गांव स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करणा-या माझ्या सर्व बांधवाना मनापासून धन्यवाद.